कराड : स्व. मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्राभर ममता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, रविंद्र हिनुकले, शिवसेनेचे मा. नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, सातारा जिल्हा दक्षता समिती सदस्य राजेंद्र माने, मलकापूर उपशहरप्रमुख दीपक मुठ्ठल, विभाग प्रमुख प्रविण लोहार, शाखाप्रमुख अमन पटेल, अशोक शिंदे, वाहतूक सेनेचे फिरोज मुल्ला, शिवकुमार वेर्णेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.