पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. ६ जानेवारी : सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पुन्हा एकदा शहरात विनामास्क वाहनचालकांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई सूरू केल्याने चांगलीच खळबळ उडाली. आज दुपारी दोन वाजलेपासून सातारा तालुका पोलिसांनी तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वडूथ आणि बोगदा परिसरात अचानक कारवाई करण्यास सुरूवात केल्याने वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली केली. विना मास्क फिरणार्या वाहन चालकांवर प्रत्येकी ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक घोडके म्हणाले, कोरोनाच्या वाढता संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.गर्दीची ठिकाणे बंद करण्याच्या सूचना ही दिल्या आहेत. विना मास्क फिरणार्यांवर ही कारवाई करण्यात येणार असून प्रत्येकी ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.पोलिसांनी आज सुरू केलेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली. अनेक विना मास्क वाहन चालकांवर यावेळी पोलिसांनी कारवाई केली. विना मास्कर फिरणाऱ्या वाहनधारकांवर आणि नागरिकांच्या वरती दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी ‘ दै. महाराष्ट्र न्यूज ‘ शी बोलताना स्पष्ट केले.