10लाख कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल सातारा –
(प्रतिनिधी)
काष्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ,आल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, जुनी पेन्शन संघटना, आरोग्य विभाग कर्मचारी संघटना व विविध कर्मचारी संघटना द्वारा कर्मचारी समन्वय समिती च्या वतीने एकच पेन्शन जुनी पेन्शनसाठी नागपूर वरून भव्य रॅली रवाना होऊन 25जिल्हातुन मार्गक्रमण करून 10लाख कर्मचारी अरुण गाडे यांचे नेतृत्वात व एस टी गायकवाड ,प्रा. मधुकर उईके, वितेश खांडेकर, अरुण खरमाटे,प्रा राहुल मुन, प्रा रमेश पिशे कृष्णा मसराम, सीताराम राठोड, नामा जाधव,अब्दुल पाशा व इतर संघटना प्रमुखांच्या पुढाकारात 14मार्चंला मंत्रालयावर धडकणार आहेत. मागणी पूर्ण होई पर्यंत वेळ पडल्यास ठिय्या आंदोलन सुद्धा केल्या जाणार आहे.जुनी पेन्शन मागणी सोबतच बाह्य यंत्रनेद्वारा भरती बंद करणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे,अंगणवाडी व आशा वर्कर्स ना शासकीय दर्जा देने व मानधन वाढ करणे तसेच पदोन्नतीतील आरक्षण लागु करणे आणि सरळसेवेतील 4.80लाख रिक्त पदे तात्काळ भरणे या मागण्यासाठी नागपूर ते मुंबई महारॅली आयोजित करण्यात आलीआहें.ही रॅली सातारा येथे १२ मार्च ला येणार असून या रॅलीत सर्व संघटनाही सहभागी व्हावे असे आवाहन सातारा जिह्यातील कास्ट्राईब कल्याण कर्मचारी महासंघाच्या वतीने भागवत करडे ,अंकुश रोकडे, अजित वाघमारे , संतोष भोकरे ,किशोर टोणपे , अधिक गंबरे , प्रशांत तायडे , विलास बनसोडे , रोहीणी वाघमारे , गोकुळ उदागे , रणदिवे, विलास पवार , गवळी , संजय साळवे , धनसिंग सोनावणे , भंडारे सर ‘ बांबळे ,, रमा जाधव प्रा. प्रकाश कांबळे , प्रा. पवार , यांनी केले आहे