महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी /कराड : वाखान परिसरात स्वतःच्या दोन लहान मुलांचा खून करून मातेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. चार महिन्यांपूर्वी तिच्या पतीचे अपघाती निधन झाल्याने विरहातून आपण हे कृत्य केले आहे. ही हृदय हेलावून टाकणारी घटना असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनुष्का आवटे असे महिलेचे नाव असून हर्षद व आदर्श लहान मुलेची नावे आहेत.
महिलेची प्रकृती गंभीर असून नातेवाईकांनी तिला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला असून त्यांच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही. त्यामुळे दोन्ही मुलांचा गळा दाबून मी स्वतः आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी त्या महिलेने लिहिली आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
वारूंजी ता.कराड येथे एका महिलेने लहान मुलांचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटनेमुळे कराड शहरातील वाखान परिसरात आज स्वतःच्या दोन लहान मुलांचा गळा दाबून खून करून मातेनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने कराडसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.






















