वाई दि.१९ मे २०२२. किकली येथे हळद पीक परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारे सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. प्रकल्प संचालक आत्मा विजयकुमार राऊत अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात मा. प्रकल्प संचालक आत्मा, सातारा विजयकुमार राऊत यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हळद लागवड करून उत्पादनवाढीवर भर देण्यास सांगितले. भूषण यादगिरवार, विषय विशेषज्ञ, के.व्ही.के. बोरगाव हळद पिकातील पूर्वमशागत, बेसल डोस, बियाणे निवड, बीज प्रक्रिया,पाणी व खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच अतुल भट यांनी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती बाबत सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मा. उपविभागीय कृषी अधिकारी, वाई, चंद्रकांत गोरड, मंडल कृषी अधिकारी, भुईंज, श्री राजेंद्र डोईफोडे, उपसभापती कृ.उ.बा.स. दिपक बाबर, उपसरपंच शेखर बाबर, संतोष बाबर सदस्य शेतकरी सल्लागार समिती,(आत्मा), प्रदिप देवरे बी. टी. एम. आत्मा, योगेश जायकर ए.टी. एम. आत्मा, कृषि सहाय्यक विजय वराळे, सुजित जगताप, परशुराम गवळी, शेळके, शेतकरी सचिन बाबर, प्रणय जाधव, संदीप बाबर व किकली परिसरातील शेतकरी उपस्थित होते.






















