गुंड नंदकुमार कचरेची पत्रकाराला धक्काबुक्की सातारा : धुळदेव, ता. फलटण येथील गट 27 मध्ये भूसंपादन प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची बातमी का लावतो? असे म्हणत गुंड नंदकुमार कचरे याने महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार सुमित चोरमले यांने धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी गुंड नंदकुमार कचरेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पत्रकार सुमित चोरमले हे कामानिमित्त भूसंपादन कार्यालय सातारा क्र.16 येथे आले असता, तेथे असलेल्या गुंड नंदकुमार कचरे याने ‘तुच का पत्रकार सुमित चोरमले, तु धुळदेव गट नं. 27 ची बातमी का लावतो? तु फलटणला जिवंत कसा जातो तेच बघतो. आज तुझी पत्रकारीताच बाहेर काढतो. माझ्यावर 16 गुन्हे दाखल आहेत अजुन एक झाला तरी मला फरक नाही पडत’, असे म्हणत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली व चोरमले यांचे दिशेने दगड ही फेकून मारले. दरम्यान, एखाद्या घटनेविरुद्ध आवाज उठविताना नेहमीच पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. आज तर चक्क 16 गुन्हे दाखल असलेल्या गुंडाकडून पत्रकारावर दगड मारत हल्ला करण्यात आला. ही बाब गंभीर असून गुंडप्रवृत्तीच्या नंदकुमार कचरेवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनेकडून होत आहे. 16 गुन्हे! मोक्कासाठी आणखी काय उणे?गुंड नंदकुमार कचरे याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. तरीही तो पत्रकाराला मारहाण करत 17 वा गुन्हा दाखल झाला
सातारा : धुळदेव, ता. फलटण येथील गट 27 मध्ये भूसंपादन प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची बातमी का लावतो? असे म्हणत गुंड नंदकुमार कचरे याने महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार सुमित चोरमले यांने धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी गुंड नंदकुमार कचरेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पत्रकार सुमित चोरमले हे कामानिमित्त भूसंपादन कार्यालय सातारा क्र.16 येथे आले असता, तेथे असलेल्या गुंड नंदकुमार कचरे याने ‘तुच का पत्रकार सुमित चोरमले, तु धुळदेव गट नं. 27 ची बातमी का लावतो? तु फलटणला जिवंत कसा जातो तेच बघतो. आज तुझी पत्रकारीताच बाहेर काढतो. माझ्यावर 16 गुन्हे दाखल आहेत अजुन एक झाला तरी मला फरक नाही पडत’, असे म्हणत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली व चोरमले यांचे दिशेने दगड ही फेकून मारले.
दरम्यान, एखाद्या घटनेविरुद्ध आवाज उठविताना नेहमीच पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. आज तर चक्क 16 गुन्हे दाखल असलेल्या गुंडाकडून पत्रकारावर दगड मारत हल्ला करण्यात आला. ही बाब गंभीर असून गुंडप्रवृत्तीच्या नंदकुमार कचरेवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनेकडून होत आहे.
16 गुन्हे! मोक्कासाठी आणखी काय उणे?
गुंड नंदकुमार कचरे याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. तरीही तो पत्रकाराला मारहाण करत 17 वा गुन्हा दाखल झाला तरी फरक पडत नसल्याची भाषा करतो. त्यामुळे कचरे याच्यात गुन्हेगारी किती ठासून भरली आहे याचा अभ्यास पोलिस प्रशासनाने करावा. तसेच नंदकुमार कचरे सारखा गुंड आणखी एखादा गुन्हा करण्याची वाट न बघता त्याच्यावर मोक्कासारखी कारवाई पोलिस अधीक्षक यांनी करावी. गुंड नंदकुमार कचरे सारख्या गुन्हेगारांना वेळीच आवळले तर जिल्ह्यातील गुन्हेगारी लवकर आटोक्यात येईल. त्यामुळे गुंड नंदकुमार कचरेवर 16 गुन्हे मग त्याला मोक्का लावायला काय उणे आहे, याचा अभ्यास करून पोलिस प्रशासनाने कारवाई करावी.
फरक पडत नसल्याची भाषा करतो. त्यामुळे कचरे याच्यात गुन्हेगारी किती ठासून भरली आहे याचा अभ्यास पोलिस प्रशासनाने करावा. तसेच नंदकुमार कचरे सारखा गुंड आणखी एखादा गुन्हा करण्याची वाट न बघता त्याच्यावर मोक्कासारखी कारवाई पोलिस अधीक्षक यांनी करावी. गुंड नंदकुमार कचरे सारख्या गुन्हेगारांना वेळीच आवळले तर जिल्ह्यातील गुन्हेगारी लवकर आटोक्यात येईल. त्यामुळे गुंड नंदकुमार कचरेवर 16 गुन्हे मग त्याला मोक्का लावायला काय उणे आहे, याचा अभ्यास करून पोलिस प्रशासनाने कारवाई करावी.