फलटण : जीएसटी कार्यालयामध्ये विविध पदांवर लावतो , असे सांगून बनावट नेमणूकपत्र आणि प्रशिक्षण देऊन तब्बल 116 जणांची सुमारे 43 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . यामध्ये फलटण तालुक्यातील तिघांचा समावेश असून यात एकूण 7 जण संशयित आरोपी आहेत . ही फसवणूक उघड झाल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे . दरम्यान , या फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे . यापूर्वी तालुक्यात असाच अनेकांची फसवणूक करणारा सैन्य भरती घोटाळा झाला होता . या घोटाळ्याच्या आठवणी या गुन्ह्यामुळे ताज्या झाल्या . दरम्यान , याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही .
याबाबत नितीश पोपटराव भोसले ( वय 28 , रा . नीलकमल अपार्टमेंट , संजीवराजेनगर , फलटण ) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मारुती गुलाबराव मोहिते ( रा . राजाळे , ता . फलटण ) , रवी अंकुश वनवे ( रा . मलठण , संतोषीमातानगर ) , कैलास भारत दोशी ( लक्ष्मीनगर फलटण , चंद्रजित अनिल पाटील , रा . कुंडलापूर , ता . कवठेमहांकाळ , संदेश लोटलीकर मुंबई , नितीन चतुर्वेदी , सचिन चतुर्वेदी ( दोघे रा . मथुरा , उत्तरप्रदेश ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत . मलठण येथील संतोषीमातानगर फलटण व माळजाई मंदिर परिसर फलटण येथे ही घटना घडली असून संशयितांनी संगनमत करुन फिर्यादी भोसले यांच्याप्रमाणे 116 मुलांना जीएसटी कार्यालयात विविध पदावर नोकरी लावतो , असे सांगून त्यांना खोटी बनावट प्रशिक्षणाचे पत्र दिले . त्यावर बनावट शिक्के मारून सह्या करून ती खरे आहे , असे भासवून युवकांचा विश्वास संपादन केला . शिवाय या तरुणांना खोटे प्रशिक्षणही दिले . यासाठी नितीश भोसले यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये रोख स्वरुपात तसेच इतर 115 जणांकडून 40 लाख 83 हजार रुपये अशी एकूण 42 लाख 73 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे . दि . 10 सप्टेंबर 2017 ते 31 मे 2022 या कालावधीत ही फसवणूक घडल्याचेही शिवाय या तरुणांना खोटे प्रशिक्षणही दिले . यासाठी नितीश भोसले यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये रोख स्वरुपात तसेच इतर 115 जणांकडून 40 लाख 83 हजार रुपये अशी एकूण 42 लाख 73 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे . दि . 10 सप्टेंबर 2017 ते 31 मे 2022 या कालावधीत ही फसवणूक घडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे . दरम्यान , या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे .






















