सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील हे शुक्रवारी दि. 11 फेब्रुवारी रोजी येणारा वाढदिवस कोरोना बंधनामुळे साजरा करणार नसल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस दि. 11 फेब्रुवारी रोजी साजरा होत असतो. मात्र यावर्षी कोरोना बंधनामुळे खा. श्रीनिवास पाटील हे आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. शुक्रवारी ते परगावी जाणार असल्याने शुभेच्छा स्विकारण्यासाठी कराड येथे उपस्थित राहणार नाहीत. तसेच कार्यकर्ते, हितचिंतकांनी कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये तसेच प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले आहे. अशी माहिती त्याच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
Inbox