रेल्वे विभागाणे रेल्वे बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या सरसकट जमिनिची संयुक्त मोजनी करावी विविध गावातील वगळलेल्या सर्व गटांचा रेल्वे भूसंपादनागत समावेश झाल्याशिवाय शेतकरी रेल्वेच्या दुहेरिकरणाचे काम सुरु करु देणार नाहीत.
कोपर्डे येथे रेल्वेची सयुंक्त मोजनी
पुणे मिरज रेल्वे दुहेरिकरण भूसंपादनासाठी आज कोपर्डे हवेली येथील शेतकऱ्यांची यादववाडी हदीतील एकूण दहा गट नंम्बर ची जमिनिची सयुंक्त मोजनी सातबारा नुसार करण्यात आली। रेल्वे च्या हद्दीचे कोणताही कागदपत्री पुरावे नसल्याने शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख कडील गटांच्या रेकॉर्ड नुसार मोजनी करण्यात आली।
कोपर्डे हवेली येथील अजुन जवळपास नव्वद शेतकऱ्यांच्या जमीनी बाधित होणार आहेत। बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा भूसंपादन प्रस्ताव रेल्वे विभागाणे तयार करुण त्याची सयुंक्त मोजनी करावी आणि शेतकऱ्यांना बाज़ारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा अशी मागणी कोपर्डे हवेलीचे ग्रामस्थ व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे।
रेल्वे दुहेरिकरणासाठी कराड तालुक्यातील रेल्वे शेजारील जमीनी प्रकल्प बाधित होत आहेत। दुहेरिकरणासाठी लागणाऱ्या जमिनिचा भूसंपादन प्रस्ताव तयार करण्यासाठी रेल्वे ने खाजगी सर्वे कम्पनीला ठेका दिला होता। सदर ठेकेदार कंपनीने शेतकऱ्यांच्या रेल्वे लगत जमिनिचा सरसकट सर्वे न करता काही रेल्वे शेजारील गट वगळले होते या विरोधात शेतकरी संघटनेने आवाज उठवला होता। कोपर्डे हवेली,पार्ले,ब्रिटिश शिरवड़े,विरवड़े,टेम्भू, सयापुर, हजारमाची येथील प्रस्तावातून वगळलेल्या गटांचा रेल्वे भूसंपादनात समावेश करावा अश्या मागनीचे निवेदने वेळोवेळी संघटनेने दिली होती।
कोपर्डे हवेली येथील सर्व रेल्वे शेजारील सर्व गटांची सयुंक मोजनी होवून भूसंपादन प्रस्ताव तयार झाल्याशिवाय आम्ही आमची जमीन देणार नसल्याचे निवेदन रयत क्रांति संघटनेच्या वतीने सचिन नलवड़े, कोपर्डे चे जेष्ठ नेते सुदाम चह्वाण,भरत चह्वाण, मोहन चह्वाण,बाळसाहेब चह्वाण,तानाजी चह्वाण, अशोक चह्वाण यांनी दिले होते