वाई पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकाची धडाकेबाज कार्यवाही………
वाई तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी सुनिल मोहन चव्हाण यांची स्कॉर्पिओगाडी घरा समोरुन दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी अज्ञात चोरटयाने ७ लाख रुपये किंमतीची गाडी नंबर (एम.एच./१४/एइ/१७०३) चोरुन नेल्याची तक्रार दिली होती. बाहेरील जिल्हयातील गुन्हे शाखेच्या अधिका-यांना-कळविलेल्या माहीतीवरुन मनमाड (जि.नाशिक) येथे मनमाड शहरच्या पोलीसांनी सदरची गाडी व दोन चोरटयांना पकडल्याची माहीती मिळाली. वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांनी तात्काळ मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे जावून सदरची स्कार्पिओ गाडी व चोरी करणारे दोन आरोपींना ताब्यात घेवून वाई पोलीस स्टेशन येथे आणले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अपर पोलीसअधीक्षक अजित बो-हाडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ शितल जानवे-खराडे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ.अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड केली.Attachments area