महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC) च्या राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. 2 जानेवारी, 2022 रोजी 290 पदांसाठी परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत येणारे एकूण 290 पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते 25 ऑक्टोबर 2021 रात्री 11:59 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचे आहेत हे सर्व अर्ज परीक्षा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.















गांधी शिल्प बाजार"" width="265" height="168"> 






