वीज कंपनीकडून वीज पोल उभे करण्यास विलंब
पाटण : पाटण अतिवृष्टीमुळे मोडून पडलेले वीज पोल ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे शेतकरी वीज कंपनीच्या नावाने संताप व्यक्त करत आहेत. सुरुल, ता. पाटण मध्येअतिवृष्टीने वीज वितरण कंपनीचे बरेचसे विद्युत पोल जमीनदोस्त झाले आहेत. वीज कंपनीकडून हे पोल उभे करण्यास विलंब होत असल्याने, शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देता येत नाही.आडसालीचे उस करपू लागले आहेत.
सुरूल येथिल हणमंत निवृत्त संकपाळ,बंडू साळुंखे रविकांत संकपाळ, विजय संकपाळ, आनंदा संकपाळ, अशोक किसन संकपाळ, जोतीराम संकपाळ, नारायण संकपाळ, सुभाष संकपाळ
या शेतकऱ्यांचे आडसालीचे उस व बागायत शेती पाण्याअभावी करपू लागली आहे. बँकेचे कर्ज काडुन शेतकऱ्यांनी लागवड ह्या केल्या आहेत. पण नदीत पाणी आसुन विधुत कंपनीच्या आडमुठी धोरणामुळे खरीपाची पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. तर सुरुल गावामध्ये आडसाली उसाची लागन मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या आडसाली उसाला लाईट बंद असल्याने पाणी देऊ शकत नाही. त्याला जबाबदार महावितरणचे अधिकारी आहेत.
22 व 23 जुलै आलेल्या महापुरामुळे केरा नदी काठावरील लाईटचे पोल व तारा जमिनीवर आहेत. त्याची दुरुस्ती योग्य वेळेत न झाल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेतीचे पाणी अभावी इलेक्ट्रिक शेती पंप बंद असल्यामुळे बागायती पिके धोक्यात आली आहेत. आडसाली ऊस वाळत आहेत.
गेल्या दोन महिन्या पासून मोठ्या प्रमाणात उन पडत आहे. पाटण तालुक्यात अतिवृष्टीने जमीन, शेती, पिके, विहिरी, यासह मालमत्तेचे मोठेनुकसान झाले. नदीकाठच्या जमिनी खचल्या, उभी पिके वाहून गेली, नदीकाठच्या लोकांच्या विहिरी, विद्युत पंप वाहून गेले, अतिवृष्टीने शेतकरी पूर्णतः अडचणीत सापडला असून वाचलेल्या पिकांसाठी सध्या पाण्याची गरज निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे विद्युत पोल वाहून गेल्याने ते अद्यापही उभे न राहिल्याने वीजपुरवठा बंद आहे. परिणामी उभी पिके उन्हामुळे करपू लागली आहेत. अतिवृष्टीने अगोदरच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून वाचलेल्या पिकांना जगविण्याचे मोठे आव्हान आहे. शेतकरी एकाबाजूला अतिवृष्टीने खचला असता दुसऱ्या बाजूला उर्वरीत पीकही हातचे जाण्याची भीती आहे. वीज वितरणकंपनीने तातडीने पोल उभे करून शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सुरुलसह मणदुरे खोऱ्यात अतिवृष्टीत वाकलेले पोल व तुटलेल्या तारा अद्याप कायम आहेत. पावसाने उघडीप दिली असून रखरखीत उन्ह पडत आहे. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. परंतु पिकाला पाणी देण्यासाठी अतिवृष्टीत वाहून गेलेले पोल उभे न राहिल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना उसासह अन्य पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. वीजपुरवठा नसल्याने पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.अतिवृष्टीने सुरुलसह मणदुरे विभागात वीज वितरण कंपनीचे बरचसे विद्युत पोल जमीनदोस्त झाले आहेत. तारा तुटल्या आहेत. साहित्य वाहून गेले आहे तर विधुत कंपनीने तातडीने विज पुरवठा सुरळीत करावा नाही तर विज वितरण कंपनीच्या पुडे आंदोलन करु, असा इशारा सुरुल मधील शेतकऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रामध्ये हणमंत निवृत्त संकपाळ बंडू साळुंखे रविकांत संकपाळ विजय संकपाळ आनंद संकपाळ अशोक किसून संकपाळ जोतीराम संकपाळ नारायण संकपाळ सुभाष संकपाळ यांच्या पत्रकावर स्वक्षऱ्या आहेत.