महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तहशील कार्यालयासमोर बुधवारी, दि.१२ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डफली , ढोल , ताशा वाजवून डफली बजाव आंदोलन केले .
राज्यभर २५ मार्च पासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती . आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळत सर्व व्यवहार सुरळीत सुरु करावेत, सर्व शासकीय, निम शासकीय ऑफिसेस , दुकाने , हाॅटेल , मार्केट सुरू करण्यात यावीत . एस.टी , बेस्ट व शहरांतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने सुरू कराव्यात , जिल्हा बंदी उठवावी यासाठी इंदापूर तहशील कार्यालयासमोर बुधवारी डफली बजाव आंदोलन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन शासनामार्फत देण्यासाठी तहशिलदार सोनाली मेटकरी यांना लेखी निवेदन देण्यात आले .यावेळी इंदापूर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके, शहराध्यक्ष हनुमंत कांबळे , प्रमोद चव्हाण , सागर लोंढे , संदीपान चितारे , सुनिल गायकवाड , सुदिप ओव्हाळ , पवन पवार , नानासाहेब बससोडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते .