महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : दहिवडी
7 सप्टेंबर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्सहात साजरी होते मात्र या वर्षी कोरोना ने संपूर्ण जगभर थैमान घातले असल्यामुळे शासनाने धार्मिक कार्यक्रम करू नये असे जाहीर केले असल्यामुळे कुठेही जयंती साजरी केली नाही. राजे उमाजी नाईक यांच्या गावोगावी सोसिअल डिस्टन्स पाळून समाज बांधव जयंती साजरी करत आहेत. रामोशी समाजाचे आधारस्तंभ असलेले संजय मंडले यांनी मुंबई वरून केरेवाडी ( पावनखिंड ) ता. कवठे महंकाळ येथे उमाजी यांच्या जयंतीला हजेरी लावली. त्यावेळी संजय मंडले म्हणाले की. रामोशी समाज हा बेडर आहे. मात्र तेवढा प्रामाणिक ही आहे. कोणावरही अन्याय होऊ नये असे युवकांनी वागावे जर समाजातील युवकांवर केली अन्याय करत असेल तर त्यांना आपण अहिंसेच्या मार्गाने धडा शिकवू. त्यासाठी मी समाजासाठी कायम कटिबद्ध राहीन मला कधीही हाक द्या असे आव्हानही त्यांनी केले

राजाभाऊ गुजले (समाजसेवक), सुभाष मलमे (खरशिंग). टाइगर मंडले (करगणी) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्याचबरोबर भरत मंडले, गणेश मंडले,विष्णु मंडले, संतोष मंडले (करगणी),सुनिल जाधव (तिसंगी), रोहित गुजले, यशवंत गुजले,अमोदीत कोळेकर (जवळा).नवनाथ पाटोळे,काकासो पाटिल,अंकुश पाटोळे, रावसाहेब पाटोळे,श्रीनिवास पाटोळे ,आनंद पाटील,नानासो पाटिल,संजय पाटोळे, संतोष पाटोळे, विकास गुजले,अजय पाटोळे, हणमंत पाटोळे, सचिन पाटोळे, श्रीकांत पाटोळे, सागर पाटोळे,विशाल चव्हाण,सागर गुजले,प्रकाश गुजले,सागर जाधव, संकेत जाधव व इतर समाज बांधव उपस्थित होते




















