महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कचरा वेचक महिलांना इनरव्हील क्लब ऑफ कराड चा मदतीचा हात अवनी संस्थेमार्फत कचरा वेचणा-या महिलांना आर्थिक मदत म्हणून इनरव्हील क्लब ऑफ कराड मधील सदस्यांनी आपापल्या घरातील प्लास्टिक व इतर ड्राय वेस्ट जस ..लोखंड, पत्रा,काच,कागद,कापड कचरा वेचणा-या महिलांना देऊ केले. ते विकून त्यातून येणा-या पैशातून या महिलां आर्थिक मदती होणार आहे. या वेळी अध्यक्ष मंजुषा इंगळे,सचिव ऋता चाफेकर ,उपाध्यक्ष सीमा पुरोहित, रेखा काशिद, अर्चना अवताडे,अपर्णा जाधव, श्रावणी घळसासी,निता सपकाळ,आदिती पावसकर व अवनी संस्थेच्या राधिका लोखंडे उपस्थित होत्या.