भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी भांडणे लावून दुफळी निर्माण केली. ते काम पाटण तालुक्यात विरोधक करत आहेत. आतापर्यंत आपण एका ताटात जेवलो आहे. सर्वांच्या सुखदुःखात आपण सगळे एकत्र आहे. दिवशी गावची एकिची परंपरा तालुक्यात अबाधित राखूया. गावागावांतील तंटे बंद करून पहिल्यासारखे केरळ विभागातील ऐकीचे बळ पुन्हा दाखवुयात हे झाले तर आमचा केलेला सत्कार सार्थ होईल. असे सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिवशी येथे झालेल्या सत्कार समारंभा वेळी बोलताना सांगितले.
दिवशी खुर्द ता. पाटण येथे ग्रामस्थ व दुध संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास पाटण तालूका दुध संघाचे अध्यक्ष सुभाषराव पवार, धारेश्वर मठाचे मठाधिपती डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, जि. प. सदस्य बापूराव जाधव, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, दयानंद गिरी महाराज, धैर्यशील पाटणकर, दिलीपराव मोटे, दुध संघाचे संचालक विजय शिंदे, संभाजीराव पाटणकर, अंकुशराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्यजीतसिंह पाटणकर पुढे बोलताना म्हणाले, गावातील विविध क्षेत्रात तरूण कार्यरत आहेत. हे कौतुकास्पद आहे. सर्वांनी सकारात्मक विचार केला तर केरळ विभागातील एकीची परंपरा कायम राहील. यावेळी सर्व सत्कार मुर्तींच्या यशाचे कौतुक करून पाटणकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले . डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज म्हणाले, माणसाने आपला आचार, विचार, गाव, धर्म या चार गोष्टी सोडू नये. आपण अपमान सहन करून दुसऱ्याला सन्मान देण शिकले पाहिजे. मतभेदामुळे इकडे तिकडे वाहत गेला असला तरी मुळ प्रवाहात आले पाहिजे. गावाचा विकास झाला पाहिजे. राजाचा कूळातला आदर करणारा सत्यजीतसिंह हा नेता आहे. देव देश आणि धर्म याचा विचार झाला तर गावचा एकोपा कायम राहील. यावेळी सुभाषराव पवार, संभाजीराव पाटणकर, विजय शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबध्दल सत्यजीतसिंह पाटणकर यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला, तसेच गावचे सुपुत्र प्रविण साळुंखे यांची मुंबई पोलिस निरीक्षक पदी बढती मिळाल्या बद्दल, सुभाषराव पवार, पत्रकार संजय कांबळे, विजय शिंदे, डॉ. संजय पवार यांचा सत्यजित पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जाधव यांनी केलेआभार सूर्यकांत सावंत यांनी मानले. कार्यक्रमास कृष्णराव पाटणकर, उत्तम शिंदे, प्रकाश झोरे, डॉ.संजय पवार, लक्ष्मण पाटील, संग्राम पाटणकर, शरद यादव, अमर पाटणकर, यमाजी पाटील, राम शिंदे, सुनिल शिंदे मानसिंग साळुंखे, प्रदीप साळुंखे, श्यामराव साळुंखे, लक्ष्मण साळुंखे, राजेंद्र शिंदे, चंद्रकांत शिंदे, दादा पाटील, सुहास जंगम, गणेश साळुंखे, विनोद पाटणकर, भिमराव मेजर, भिमराव डूबल, यांसह केरा विभागातील कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Attachments area