मागील आठवड्यात महाराष्ट्र न्यूजने शिवकृपा पतपेढीचा मनमानी कारभार जामीनदार व कर्जदार यांच्या जीवावर उठल्याची बातमी करून शिवकृपा पतपेढी राज्यभरात कर्ज वसुलीसाठी चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने मानसिक त्रास देऊन छळ करण्याच्या हेतूने शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांच्या बाहेर जाऊन वसुली करत असल्याचे जनतेसमोर आणले होते ही बातमी महाराष्ट्र न्यूज च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचल्यावर शिवकृपा पतपेढीच्या चुकीच्या व नियमबाह्य कर्ज वसुलीचे बळी झालेले अनेक कर्जदार व जामीनदार जागे झाले व त्यांना आपल्यावर शिवकृपा पतपेढीकडून होत असलेल्या चुकीच्या व नियमबाह्य वसुलीच्या संदर्भात जाग आली व शिवकृपा पतपेढीच्या विरोधात कर्जदार व जामीनदार यांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या महाराष्ट्र न्यूज कडे वाढू लागली आहे शिवकृपा पतपेढी जामीनदार व कर्जदार यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज वसुली करत असल्यामुळे कर्जदार व जामीनदार यांना त्यांच्याच कर्जाची कागदपत्रे देण्यास टाळा टाळ करत असल्याचे काही कर्जदार व जामीनदार यांच्याकडून बोलले जात आहे यापुढे कोणत्याही कर्जदार व जामीनदारावर शिवाकृपा पतपेढी अन्याय करत असल्यास त्यांनी महाराष्ट्र न्यूज या दैनिकाशी संपर्क साधावा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सभासदांवर कर्जदारांवर व जामीनदार त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र न्यूज सदैव आवाज उठवत राहील व त्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी न्याय मागत राहील.
शिवकृपा पतपेढी कडून कर्जदार जामीनदार यांच्या हक्काची ऐशी की तैशी…..
वास्तविक पाहता पतपेढीने कर्जदार व जामीनदार यांच्यावर वसुलीसाठी कार्यवाही करताना त्या कार्यवाहीची लेखी प्रत त्या कर्जदाराला व जामीनदाराला देणे आवश्यक असते जेणेकरून त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईची माहिती त्यांना मिळेल परंतु शिवकृपा पतपेढी चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने कर्ज वसुली करत असल्यामुळे आपला खोटेपणा उघडा पडू नये म्हणून कार्यवाहीची प्रत कर्जदार व जाम यांना जाणून बुजून दिली जात नाही व त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या कार्यवाहीची माहिती मिळण्याच्या हक्कापासून लांब ठेवले जात आहे असे कर्जदार व जामीनदार यांच्याकडून महाराष्ट्र न्यूज ला सांगण्यात आले.सहकार आयुक्त कार्यवाही करणार का?….
28/12/2022 रोजी पीडित कर्जदाराने शिवकृपा पतपेढी विरोधात सहकार आयुक्त यांना लेखी तक्रारी अर्ज देऊन शिवकृपा पतपेढी कडून 28/10/2009 च्या शासनादेशाला केराची टोपली दाखवत नियमबाह्य पद्धतीने जामीनदारांची खाती गोठवत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे तरी या प्रकरणी सहकार आयुक्त कार्यवाही करणार का? का यापुढेही शिवकृपा पतपेढीला मनमानी कारभार करत जामीनदारांचा मानसिक छळ करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणून त्यांचा संसार उध्वस्त करण्यासाठी पाठीशी घालणार हेही पाहणे महत्वाचे आहे.