महाराष्ट्र न्यूज/कळंब-प्रतिनिधी/शहाजीराजे भोसले
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावरील झालेल्या हल्ल्याचा इंदापूर शहर भाजपाकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, इंदापूर पोलीस स्टेशन व तहशील कार्यालयास लेखी निवेदन देत या प्रकरणातील हल्लेखोरास कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
इंदापूर शहर भाजपाच्या वतीने गुरूवार दि.९ रोजी इंदापूर नगर परिषदेच्या समोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास युवानेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या .
यावेळी इंदापूर अर्बन बॅंकेचे चेअरमन व नगरसेवक भरत शहा , शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद , गणेश महाजन , जावेद शेख , सचिन जाणार , सागर आरगडे , आनंद मखरे , मिलिंद गायकवाड आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते .
निवेदनात राजगृहावरील हल्ला हा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न असून फुले , शाहु , आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे .सदरच्या घटनेचा इंदापूर शहर भाजपा जाहीर निषेध करत असून हल्लेखोरांवर कारवाई होण्याची मागणी केली आहे.