पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील मंडळांनी सहभागी होण्याचे स.पो.नि रविंद्र तेलतुंबडे यांचे आवाहन
नागठाणे :-प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा जोपासत व आपल्या गणेश उत्सव मंडळातर्फे विविध प्रकारचे सामजिक स्त्युत उपक्रम हाती घेत गणेशोत्सव साजरे करणार्या मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने गणराया अवार्ड देऊन सन्मानित केले जात होते
पण क़ोरोनाच्या संकटात हे उपक्रम राबविण्यात आले नाहीत
पण यावर्षी पासून पून्हा एकदा गणराया अवार्ड देऊन गणेशोत्सव साजरा करणार्या मंगळाना सन्मानित करण्यात येणार असून
बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे तसेच गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडवा याकरिता गणराया अवार्ड ही संकल्पना बोरगाव पोलीस ठाणे मार्फत राबविण्यात येणार असून त्यासाठी गणराया अवार्ड समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये बोरगावच्या महिला पो.उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर,पत्रकार दत्ता घाडगे,सामाजिक कार्यकर्ते गणेश साळुंखे,मुख्या.अजित साळुंखे ,अजित कुमार जाधव,कला वाणिज्य विद्यालय नागठाणे ही 5 सदस्यिय समीती गठित करण्यात आली आहे ही समीतीत हद्दीतीलगणेश मंडळांना भेटी देऊन व निरीक्षण करून नंतर गणराया अवार्ड दिले जाणार आहेत. तरी सर्व पोलीस पाटील यांनी आपले हद्दीतील सर्व गणेश मंडळे यांना सुचना देऊन तयारी करावी असे आवाहन बोरगावचे स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे यांनी केले आहे