नवारस्ता : महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गत प्रतिवर्षी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. चालू शैक्षणिक वर्षात मायक्रोबायोलॉजी सोसायटी इंडिया महाविद्यालयातील युनिटचे उद्घाटन सदरच्या रक्तगट तपासणी शिबिराने झाले.
कोव्हीड महामारी च्या काळात शालेय जीवनापासून मुलींना आपल्या चांगल्या आरोग्याविषयी जागृती असावी या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन डॉ. मनीषा सपकाळ, विभाग प्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. या शिबिरात डॉ. विद्या पाटील, पाटण यांनी रक्तशय या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वाढत्या वयातील बदल, आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी व व्यायाम यांचे महत्व प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. शिबिरात बीएससी भाग २ सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थिंनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींचे रक्तगट तपासून दिले.
यावेळी शिबिरास डॉक्टर विना नागरे सचिव रोटरी क्लब पाटण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार, जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर माने सी. यू., आई क्यू एसी को-ऑर्डिनेटर डॉ. फडणीस पी. वाय., राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर पट्टेबहादूर जी. एस. बडेकर मॅडम उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार सौ. शिलादेवी पाटणकर मुख्याध्यापिका कन्याशाळा पाटण यांनी मानले.