माण तालुक्यातील दानवलेवाडी गावातील आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मृद व जलसंधारण विभाग(स्थानिक स्तर) कृष्णानगर सातारा या विभागाकडून मंजूर मौजे दानव लेवाडी क्र 2 साठवण बंधारा (२५ लक्ष) व अरुण गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून लघु पाट बंधारे विभाग जिल्हा परिषद सातारा या विभागाकडून मंजूर केलेल्या मौजे दानवलेवाडी (बेलमळा १३.७० लक्ष)सिमेंट बंधारा या कामांचे भुमिपूजन कार्यक्रम अरुण गोरे (सदस्य जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती सातारा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमात प्रसंगी किसन सस्ते , रमेश कदम, नाना वळकुंदे, दिलीप साळुंखे, आनंदराव तरटे, सुरेश घाडगे, अरविंद शिंदे, किसन साळुंखे, राहुल साळुंखे, दशरथ तरटे, गुलाब शिंदे, दिलीप शिंदे, हरिश्चंद्र कदम, भगवान रांजणे, वसंत शिंदे, पांडुरंग तरटे, प्रकाश जगदाळे आणि समस्त बेलमळा-बोराटे वस्ती वरील ग्रामस्थ उपस्थित होते.