बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे
सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर व्यायाम ग्रुपचे सदस्यानी सोमेश्वरनगर ते कडेपठार लिंग खंडोबा येथे २९ किमी डोंगर दरीतुन पायी प्रवास करीत अडीच किमी ची उतरण करीत सुमारे ३१ .५ किमी अंतर चालुन खंडोबाला जगाला कोरोनामुक्तीचे साकडे घातले .
सोमेश्वर येथील राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशव जाधव ,आरोग्य सेवा कर्मचारी परवेझ मुलाणी ,ॲड गणेश आळंदीकर ,मदन काकडे देशमुख ,दादासाहेब भंडलकर ,संभाजी गायकवाड ,रविंद्र पवार यानी ही पायी वारी करुन खंडोबाला साकडे घातले .
लॉकडावुन मुळे मंदीर बंद असलेने वरती मंदीराच्या बाहेरील बाजुने यानी खंडोबा ला साकडे घातले .अवघड चढ उतार ,डोंगरदरी ,मार्गे सोमेश्वरहुन निघालेले हे सर्वजण रुपाडी आई चा डोंगर ,ब्राम्हण दरा ,कर्नलवाडी ,राख ,बाळाजीची वाडी ,बहिर्जीची वाडी ,दौंडज रेल्वेस्टेशन मार्गे दौंडज खिंड व तरसदरा डोंगरातुन अवघड चढण करीत कडेपठार वर सुमारे सहा तास २९ मिनिटे चालुन २९ .७५ किमी चे अंतर पार केले व पुन्हा अडीच किमी परत उतरण असे ३१.५ किमी चे अंतर पार केले .
नियमीत सलग तीन वर्ष या गृप च्या सदस्यानी दर शनिवारी कडेपठार पायथ्यापासून चालुन वारी केली होती याशिवाय हरिश्चंद्रगड ,तोरणा गड ,राजगड ,जरंडेश्वर ,व्याघ्रगड (वासोटा )चालतच करंजेपुल ते सोमेश्वरमंदीर असे अनुभव होते असे यानी सांगीतले. कोरोनाचे संकट कष्टप्रद असल्याने व रस्त्याने गर्दी होवु नये या कारणाने डोंगरदऱ्यातुन प्रवास करुन खंडोबाला साकडे घालायचा या तरुणानी निश्चय केला व तो पुर्ण ही केला . यांच्यामधे शिक्षक व आरोग्य सेवक असल्याने वाटेत दिसणाऱ्या व्यक्तीना कोरोनाबाबतचे गैरसमज याबद्दल ही माहीती त्यानी दिली .आमच्या अनोख्या वारीची दखल ईश्वरदरबारी घेतली जाईल व कोरोनाचे संकट दुर होइल असा विश्वास यानी यावेळी व्यक्त केला .