कराड : लिबर्टी मजदूर मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू व संस्थापक संचालक बाळकृष्ण सोनाप्पा रेपाळ (वय 88) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
लिबर्टी मजदूर मंडळाच्या संस्थापक संचालक म्हणून ते कार्यरत होते. मैदानी व मर्दानी खेळासाठी बाळकृष्ण रेपाळे यांनी योगदान दिले असून अलीकडच्या पिढीतील युवकांना या खेळाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असत. वयोमानानुसार गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.त्यांच्या पश्चात मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ८ सप्टेंबर रोजी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील ,उपाध्यक्ष अरुण जाधव, सर्व खेळाडू यांनी बाळकृष्ण रेपाळ यांना आदरांजली वाहिली.