यशवंतनगर ता.कराड येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने जलजीवन मिशन योजना २०२१-२२ मधून मंजूर झालेल्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, खोदकाम सुरू असलेल्या विहिरीच्या कामाची पाहणी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केली. व नवीन नळपाणीपुरवठा योजनेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या, सदर योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी कारखान्याच्यावतीने त्यांचे स्वागत कार्यकरी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डे.सिव्हिल इंजिनिअर प्रताप चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बसुगडे, यशवंतनगरचे

सरपंच तुळशीराम चव्हाण, उपसरपंच सौ लीना जाधव, सौ.वीरश्री करांडे, सौ.संजिवनी माळवे, सौ.अरुणा देशमुख, ग्रामपंचायत सदस्य पी.एस.सोनवणे, विकास चव्हाण, रघुनाथ येडगे, हणमंत काळेबाग, शाखा अभियंता सौ.कुंभार, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी.आर.यादव, चीफ अकौंटंट जी. व्ही.पिसाळ, कामगार व कल्याण अधिकारी एन.आर.जाधव, परचेस अधिकारी जे.डी.घार्गे, सिव्हिल इंजिनिअर वाय.जे.खंडागळे, डे.सिव्हिल इंजिनिअर प्रताप चव्हाण, ऊस विकास अधिकारी व्ही.बी.चव्हाण, जनसंपर्क अधिकारी व्ही.जे.शेलार, इरिगेशन इंजिनिअर संजय क्षीरसागर, वाहन विभाग प्रमुख मोहन पिसाळ, एम.के साळुंखे आदी उपस्थित होते.





















