महाराष्ट्र न्यूज (इंदापूर) प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये कोरोनाच्या दहशतीमुळे गेली ५ ते ६ महिन्यांपासून बंद आहेत. परंतु सध्य परिस्थितीत सार्वजनिक ग्रंथालयातून चालणारे अभ्यासिका , स्पर्धा , परिक्षा केंद्र सुध्दा बंद ठेवण्यात आली आहेत . ग्रंथालयांचे वाचक , हितचिंतक , सभासद , जेष्ठ नागरिक , विद्यार्थी व पालक यांच्याकडून ग्रंथालये / वाचनालये सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी होत असल्यामुळे , पुणे जिल्हा ग्रंथालय संघाने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये पुर्ववत सुरू करण्यात यावीत , याकरिता पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .
निवासी उपजिल्हाधिकारी कटारे मॅडम् यांना निवेदन देताना सोपानराव पवार साहेब प्रमुख कार्यवाह , संघाचे सर्वश्री रमेशराव सुतार , राजेंद्र ढमाले , संतोष गोफणे , चंद्रशेखर कपोते , मोहन महाराज शिंदे , राजु घाटोळे आदी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी उपस्थित होते