पाटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकार्यांच्या निवडी नवारस्ता येथे झालेल्या बैठकीत नुकत्याच पार पडल्या. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी राहुल विलासराव सत्रे तर कार्याध्यक्षपदी नितीन जगन्नाथ पाटील, सचिवपदी मच्छिंद्र रावसाहेब भिसे आणि संघटकपदी रवींद्र ज्ञानदेव साळुंखे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी हिम्मतराव पवार (मल्हारपेठ विभाग), आनंदा सुरेश कुंभार (चाफळ विभाग), यशोदीप माणिकराव तांबे (तारळे विभाग), संभाजी शिवाजी चाळके (कोयना विभाग) अशी निवड करण्यात आली. प्रसिद्धीप्रमुख अमित बबन शिंदे तर सदस्यपदी संग्राम पांढरपठ्ठे, नितीन पाटील, उमेश पवार, शेखर देशमुख, राजाराम इंगळे, कल्पेश चव्हाण, वैभव मोरे, अजित पवार, संजय कदम, जगन्नाथ माने यांची निवड करण्यात आली.
निवड प्रसंगी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करून संघटनेने दिलेल्या पदाचा योग्य वापर करून समाजापुढे आदर्श निर्माण करण्याची उपस्थितांना हमी दिली. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे पाटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव ही झाला.