
लोकमत सखी मंच हे महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व महिला सक्षमीकरण यांसाठी प्रोत्साहित केले जाते. यावेळी हळदी-कुंकवाच्या माध्यमातून ब्लॅक ब्युटी व उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यातून अनेक महिलांना त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये उपस्थित ६०० महिलांमधून १५० हून अधिक महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातून अनेक महिलां बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. यांपैकी संजीवनी खांडके या ब्लॅक ब्युटी स्पर्धेच्या यशाच्या पहिल्या नंबरच्या मानकरी ठरल्या यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले.
लोकमत सखी मंच कराड मर्चंट व कराड महिला मर्चंट बँक तसेच रेनबो किचन ट्रॉली कराड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी-कुंकू समारंभ अगदी उत्साहात सुस्वाद हाॅल म्हावशी पेठ, पाटण येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित पाटणचे सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन पिसाळ, लोकमत सखी संयोजिका स्नेहा तोडकर, लोकमत सखी मंच पाटण विभाग प्रतिनिधि सौ.जयश्री जंगम, सौ.संजवनी खांडके सौ.प्रज्ञा माने (मराठे), श्री. महेश जंगम, कराड मर्चंड शाखा अधिकारी श्री. रफीक सय्यद व कराड मर्चंड बॅकेच्या सर्व संचालिका उपस्थित होत्या. अनेक महिलांनी लोकमत सखी मंच चे व प्रायोजकांचे मनापासून आभार मानले.






























