महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : दहिवडी
सातारा दहिवडी रस्त्यावर असलेल्या पिंगळी गावात असणार पूल हा पावसाळ्यात कायमच धोकादायक असतो. पुलाची उंची कमी असल्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या या पुलावरून पाणी जाते. त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे बंद असते. मात्र या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिंगळी पुलावरून मोठया प्रमाणात पाणी गेल्यामुळे पुलावर मोठ मोठे खड्डे पढले आहेत.

या खड्ड्यामुळे दुचाकी आढळून पुलावरून पाण्यात पडण्याची शक्यता आहे. अगोदरच या पुलाला संरक्षण कटडे नाही. त्यातच हे खड्डे. जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.प्रशासन मात्र या खड्ड्याकडे दुर्लक्ष करत आहे.




















