बाळासाहेब देसाई कॉलेज मध्ये रेडॉन जिओ स्टेशनची उभारणीपाटण तालुक्यातील भूकंप हालचालीवर लक्ष ठेवणे होणार सोपे
कोयना शिक्षण संस्थेचे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण याठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत रेडॉन जिओ स्टेशनची उभारले असून याच्या माध्यमातून पाटण तालुका परिसरातील भूकंपसदृश हालचालीवर लक्ष ठेवणे आता सोपे होणार आहे.भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांच्या मार्फत इंडियन नेटवर्क फॉर डिटेक्शन ऑफ रेडॉन अॅनोम्ली हा प्रकल्प सुरु केला आहे. त्यासाठी स्वतंत्र, सौर उर्जेवर चालणारे रेडॉन जिओ स्टेशन विकसित केले आहे.या प्रकल्पा अंतर्गत रेडॉन जिओ स्टेशन देशाच्या वेगवेगळ्या भागात उभारण्यात येत आहे. रेडॉन जिओ स्टेशनची उभारणी पासून ते देखभाली पर्यंतचा सर्व खर्च भाभा अणु संशोधन केंद्राकडून करण्यात येणार आहे. बाळासाहेब देसाई कॉलेजच्या परिसरात या स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे.स्टेशन सौरउर्जा व डेटा कम्युनिकेशन द्वारे चालवले जाणारे स्वतंत्र युनिट आहे.यामध्ये बी.एस.एन.एल. सिमचा वापर केला असून साधारणपणे १०० किलो वजनाचे हे स्टेशन दोन मीटर जागेत स्थापित केले आहे. पाटण तालुका परिसरातील भूकंपसदृश हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने रेडॉन जिओ स्टेशन महत्वपूर्ण ठरेल अशी माहिती रेडॉन जिओ स्टेशनचे बाळासाहेब देसाई कॉलेजमधील समन्वयक प्रा. संदीप तडाखे यांनी दिली. डॉ.महेंद्र गायकवाड यांनी जिओ स्टेशन विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी एन.एस.एस. प्रकल्पधिकारी डॉ.जी.एस.पट्टेबाहदूर, अधीक्षक विजय काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट रेडॉन जिओ स्टेशनची उभारणी हे बाळासाहेब देसाई कॉलेज च्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब आहे. हे जिओ स्टेशन परिसरातील भूकंपीय हालचालींचे निरीक्षण करून भूकंपशास्त्रीय संशोधनासाठी डेटाबेस तयार करेल. भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाच्या मदतीने उभारलेल्या या रेडॉन जिओ स्टेशनमुळे पाटण परिसरातील भूकंप सदृश हालचालींचा अभ्यास करता येईल. डॉ.एस.डी.पवारप्राचार्य,बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण