कोरोना काळात निद्रारोग, बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. २६ मार्च :प्रदीर्घ काळ बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम आता दिसून येत असून अनेक मुलांमध्ये झोपेचे आजार बळावल्याचे निरीक्षण निद्रा व बालरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
कोरोना काळात दोन वर्षे शाळा बंद होत्या. मुले मोबाईल, लॅपटाॅप, संगणकावर शिक्षण घेत होते. दुसरीकडे मैदानी खेळ बंद होते. त्याऐवजी मुलांमध्ये व्हिडीओ गेम खेळण्याचे प्रमाण वाढले. मोबाईलमधून ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन’ निघतात. ते लहान मुलांच्या मेंदूसाठी फारच हानिकारक ठरतात. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, तणाव, निद्रानाश व कानाच्या पडद्यावरही परिणाम होतो, असे निद्रारोग व बालरोग तज्ज्ञांचे मत आहे.