कराडात पून्हा पिस्तूलधारी यूवकांना पोलासांचा हिसका तिघे ताब्यात.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शहरातील कृष्णा नाका परिसरात देशी बनावटीच्या पिस्तुलसह तडीपार असलेल्या दोन आरोपींसह तिघांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे.चेतन श्याम देवकुळे (वय 23), श्रीधर काशीनाथ थोरवडे (वय 20), अतिश सुनिल थोरवडे (वय 27) तिघेही रा. बुधवार पेठ, कराड यांच्यावर कराड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे काल रात्री ही कारवाई करण्यात अली असून पोलिसांनी दिलेली माहितीनूसार श्रीधर थोरवडे व अतिश थोरवडे या दोघांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. बुधवारी रात्री श्रीधर थोरवडे, अतिश थोरवडे व चेतन देवकुळे हे तिघेजण कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे पिस्तुलच्या सहाय्याने लोकांच्यात दहशत निर्माण करीत वावरत असल्याची माहिती डीवायएसपी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे डॉ. रणजित पाटील यांनी एक पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. डीवायएसपी पथकातील पो.उपनिरिक्षक राजेंद्र पूजारी, पो.ना.प्रविण पवार, सागर बर्गे, असिफ जमादार, दिपक कोळी यांनी कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे सापळा रचून चेतन देवकुळे, श्रीधर थोरवडे, अतिष थोरवडे यांना ताब्यात घेतले. तिघांचीही अंगझडती घेतली असता चेतन देवकुळे याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच पोलिसांनी तडीपार असलेले श्रीधर व अतिष या दोघांना हद्दीत प्रवेश करण्यासाठी परवानगी पत्र आहे का असे विचारणा केल्यावर त्यांच्याकडे परवानगी पत्र नसल्याची पोलिसांना खात्री झाली.
पोलिसांनी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसासह तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान तडीपार केलेले शहरातील अनेक जणांचा मूक्काम पून्हा कराडात दिसून येत आहे.मात्र कराड शहर पोलिस याबाबत हातबल असल्याने तडीपारांचे फावले असल्याचे नागरिक सांगतात.मात्र पोलिसांचे कायद्याने हात बांधल्याने त्यांनी ही या कारवाईवर नांगी टाकली आहे.शहरातील आठ ते दहा जणांची हद्दपारी झाली असताना ते पुन्हा शहरात दिसून येत आहेत ते काल रात्रीच्या कारवाईतून सिध्द झाले आहे. तडीपार झालेले दूसर्याच दिवशी कूणाच्या कृपेने पून्हा शहरात दाखल होतात हा मोठा चर्चेचा व संशोधनाचा विषय बनला आहे.