महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. 8 मे : आयुष्य हे खूप सुंदर व आनंदी आहे. सर्वश्रेष्ठ हे हास्य आहे. आयुष्यात हास्य हाच आनंदी व सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. प्रत्येकांनी निरोगी आरोग्य हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती मानून शरीर व मनाची मशागत करा असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंपताना ” चला आनंदात जगूया ” या विषयावरील व्याख्यान्यात वसंत हंकारे बोलत होते. अध्यक्षस्थानी पाचगणीचे पोलीस निरीक्षक सतीश पवार होते. यावेळी मा.नगरसेवक व व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रकाश गोळे , प्र. प्राचार्य डाॅ.सतीश देसाई,प्रसिध्द साहित्यिक जगन्नाथ शिंदे ,कासवंडचे ग्रामपंचायत सदस्य नीलेश गोळे,नितीन भिलारे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अमर बिरामणे,रोटरी कल्बचे अध्यक्ष शिवाजी शिंदे,रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष किरण पवार,माजी विद्यार्थी संघाच्या उपाध्यक्षा सौ.पूनमताई कांबळे,शैलेश मुळे,सामाजिक कार्यकर्ते नितीन कासुर्डे,सामाजिक कार्यकर्ते संतोष कवी,रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे,विठ्ठल दुधाने,मधूकर बिरामणे,प्राचार्य मुळे,सामाजिक कार्यकर्ते भारत पुरोहित,सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानावरून बोलताना पोलीस निरीक्षक सतीश देसाई म्हणाले,पाचगणीत महेता काॅलेज व ग्रामस्थ हे व्याख्यानमालेद्वारे प्रबोधन व जनजागृतीचे कार्य करीत आहेत, ही बाब खूप कौतुकास्पद आहे. यशस्वी व आनंदी जीवनासाठी प्रत्येकाच्या जीवनात हास्य असणे हे महत्वाचे असते.प्रत्येकांनी सुखी व आनंदी जीवन जगावे.
प्रास्ताविक ह.भ.प.विनोद कळंबे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डाॅ.मिलींद सुतार यांनी करून दिला.सूत्रसंचालन सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर व प्रा.शितल पवार यांनी केले.आभार प्राचार्य डाॅ. सतीश देसाई यांनी मानले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते भाग्यवंत श्रोता कुपन काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.व्याख्यानास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.