फलटण तालुक्यातील चर्चेचा विषय आसलेला म्हणजे दिगंबर आगवणे आणि खासदार यांच्यातील वाद .या वादातूनच दिगंबर आगवणे हे उपोषणाला बसले होते.आणि आता दिगंबर आगवणे आणि खासदार समर्थक यांनी एकमेका विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
सविस्तर वृत्त असे की खासदार निंबाळकर आणि आगवणे यांच्यातील पैश्याचा विकोपाला गेला असताना आता या दोन गटात फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.फलटण पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण येथील पत्रकार संदीप जाधव यांनी दिगंबर आगवणे आणि त्यांच्या पत्नी सौ आगवणे यांच्या विरोधात वार्तांकन करण्यासाठी गेले असता राग मनात धरून धक्काबुक्की केल्या असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच बरोबर खासदार गटाचे अनुप शहा यांनी सुद्धा दिगंम्बर आगवणे,त्यांच्या पत्नी तसेच प्रमोड जाधव यांच्या विरोधात फलटण पोलीस स्टेशन येथे पत्रकार संदीप जाधव आणि जुनेद शेख यांच्या गाडीचे चालक म्हणून अनुप शहा गेले असता त्यांना शिवीगाळ करून तसेच गाडी आडवी लावून जाण्याचा अटकाव केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात अनुप शहा यांनी तक्रार दाखल केली आहे. जयश्री दिगंबर आगवणे यांनी सुद्धा अनुप शहा यांनी वाठार निंबाळकर याठिकाणी जाऊन आपल्या तीनचार साथीदारांसह ऑफिसवर जाऊन अनधिकृत घुसून जयश्री आगवणे,तसेच त्याचे पती दिगबर आगवणे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी कलम ४४७,५०४,५०६,३४ अंतर्गत फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ReplyForward |