बारामती प्रतिनिधी:विनोद गोलांडे
बारामतीमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येचा अहवाल वाढतच आहे. बारामती मध्ये काल एकूण ८८ नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ३५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून ५३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच खाजगी प्रयोगशाळेमध्ये बारामती मध्ये ४४ नमुने अॅंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी २४ जणांचा अहवाल निगेटिव्हआला असून बारामती शहरातील १४ व ग्रामीण भागातील ६ असे वीस जणांची एंटीजेन टेस्ट पॉझिटिव्हआलेली आहे त्यामुळे बारामतीतील रुग्णसंख्या ४३८ झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील बुरुडगल्ली येथील चार ,संघवीनगर येथील दोन, कुंभार गल्ली कसबा येथील दोन, साठे नगर कसबा येथील दोन, जळोची येथील एक,अशोकनगर येथील एक, मार्केट यार्ड रोड अमराई येथील एक व शहरातील एक असे १४ जण व पारवडी येथील एक, पाहुणेवाडी येथील एक, काटेवाडी घुले वस्ती येथील एक, माळेगाव येथील एक, वाघळवाडी येथील एक व कटफळ येथील एक असे ग्रामीण भागातील ६ असे एकूण २० जणांची अॅन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे