महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
दोन वर्ष कोरोना काळात गेली अनेकांचा बळी गेला शेतकऱ्यांना तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले उद्योग धंदे ठप्प झाले मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली शासनाच्या अनेक निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश सातारा जिल्ह्यातील जनतेने तंतोतंत पाळून प्रशासनास सहकार्य केले परंतु आता जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यात. हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला अपघात हे खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात होतात परंतू प्रशासनाचे तिकडे दुर्लक्ष आहे प्रथमता जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीचे आदेश काढावेत मग हेल्मेट सक्तीचा आदेश काढावा हेल्मेट सक्तीच्या विरोधात सातारा जिल्ह्यात तीव्र संताप होत आहे सातारा जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावा अन्यथा सातारा जिल्ह्यात मोठं जन आंदोलन उभा करु होणार्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल असे साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे