तरुणांच्या क्रिडा गुणांना वाव देण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी छावा प्रतिष्ठान बावधन च्या माध्यमातून स्व.मदनरावजी पिसाळ क्रिडा संकुल बावधन येथील भव्य मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात शिरवळ संघाने विलासपूर संघावर मात करून पहिल्या पर्वाच्या विजयाचा मान मिळवला. यावेळी अंतिम विजेत्या संघाला ५१,१५१ रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर द्वितिय, तृतिय, चतुर्थ आणि उत्तेजनार्थ विजेत्या संघाला अनुक्रमे ३११३१, २११२१, १११११, ७७७७ रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलदांज यांना ही सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

उत्कृष्ट मैदान सजविल्यामुळे युवक खेळाडूंमध्ये मोठा उत्साह यावेळी येथे पहावयास मिळाला. यावेळेस बोलताना विजयसिंह पिसाळ म्हणाले बावधन सारख्या ग्रामीण भागात ही स्पर्धा सुरू झाल्याने अनेक क्रिकेटप्रेमींना या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे. बावधन गाव हे विकास कामात कायम अग्रेसर असून या गावात युवकांसाठी विविध उपक्रम सुरू करून त्यांना मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. खेळा मध्ये नेहमी हार-जीत होत असून यातून खिलाडी वृत्ती जपली पाहिजे. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून युवकांना खेळाचे व्यासपीठ मिळावे म्हणून या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले गेले. ग्रामीण भागात मुलांमध्ये मोठी गुणवत्ता असते त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवतील. क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ असून युवकांचा ओढा क्रिकेट या खेळात जास्त आहे. मैदानी खेळामुळे आरोग्य चांगले राहते. प्रत्येकाने एक तरी मैदानी खेळाचे छंद जोपासला पाहिजे. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते जीवनात आनंद निर्माण होतो. ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी छावा प्रतिष्ठान ने ही मोठी संधी निर्माण करून दिली आहे त्याबद्दल त्यांचे ही मी मनापासून अभिनंदन करतो.या कार्यक्रम प्रसंगी बोलताना पंचायत समितीचे मा.सभापती दिलीप बाबा पिसाळ म्हणाले आपल्या तालुक्यातील सर्व युवकांना विजू भैय्या च्या रुपाने युवकांना प्रोत्साहन देणारा युवा नेतृत्व लाभले आहे. त्याचबरोबर छावा प्रतिष्ठान ने सुद्धा यापूढे त्यांचे समाजकार्य असेच चालू ठेऊन रक्तदान शिबिर यांसारखे अनेक उपक्रम राबवावेत आणि सर्व विजेत्या संघाबरोबर मी छावा प्रतिष्ठानचेही अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला जि.प.मा.अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, सहकारी सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत दादा पिसाळ, पंचायत समिती मा.सभापती दिलीप बाबा पिसाळ, पंचायत समिती मा.उपसभापती मदन आप्पा भोसले, वाई नगरीचे नगराध्यक्ष अनिल सांवत, रा.काँ.चे.युवक अध्यक्ष प्रमोद अनपट, बावधन विकास सोसायटी चेअरमन रमेश काका पिसाळ, अजित पिसाळ, अॕड.विजयसिंह पिसाळ यांच्या सुविद्य पत्नी प्रियांकाताई पिसाळ वहिनीसाहेब, युवा उद्योजक गणेश अनपट, नितिन मांढरे, पै तानाजी कचरे, समाधान कदम, चेतन पिसाळ, तसेच छावा प्रतिष्ठान बावधन, विजयसिंह पिसाळ युवा मंच आणि रा.काँ.पार्टीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत सांगली, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील बंहुसंख्य संघ सामिल झाले होते. या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.




















