पाटण नगरपंचायत विषय समिती सभापती निवडीं मध्ये उपनगराध्यक्ष सागर पोतदार यांची पाणीपुरवठा , स्वच्छता व जल : निसारण सभापतीपदी तर बांधकाम सभापती पदी माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार , नियोजन विकास व शिक्षण सभापती राजेंद्र राऊत, महिला व बालकल्याण सभापती सौ . अनिता देवकांत यांची निवड झाली. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीच्या वतीने नगरपंचायत सभापती विषय समिती सभापती पदाच्या निवडी गुरुवारी पार पडल्या . पिठासीन तथा पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे व नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या . नगरपंचायत विषय समिती सभापती पदाच्या निवडीत बांधकाम सभापतीपदी सचिन कुंभार, समिती सदस्य संतोष पवार, स्वप्निल माने,सौ. सोनम फुटाणे यांची, नियोजन विकास व शिक्षण सभापती पदी राजेंद्र राऊत , समिती सदस्य उमेश टोळे, किशोर गायकवाड, जगदीश शेंडे, महिला व बालकल्याण सभापती पदी सौ. अनिता देवकांत, सदस्य सौ. मिनाज मोकाशी, सौ. संज्योती जगताप, सौ. संजना जवारी यांची निवड करण्यात आली . विद्यमान उपनगराध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने पाणीपुरवठा , स्वच्छता व जल : निसारण सभापती पदी सागर पोतदार यांची व सदस्यांमध्ये स्वप्निल माने, सौ. सोनम फुटाणे , सौ. सुषमा मोरे यांची निवड करण्यात आली.या निवडीवेळी नगराध्यक्षा सौ. मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार आदी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विक्रमसिंह पाटणकर ,सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उप सभापती प्रतापराव देसाई, माजी जि. प. शिक्षण सभापती राजेश पवार , पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजे महाडिक , खरेदी-विक्री संघ चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे ,तालुका दूध संघ चेअरमन सुभाषराव पवार, कोयना शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, बाजार समिती सभापती रेखाताई पाटील, उप विभागीय अधिकारी सुनील गाढे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आदींनी अभिनंदन केले .
चौकटमाजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच पाटण शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता ,रस्ते ,आरोग्य ,कचरा ,गटारे आदी मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्ही सर्वजण नगरसेवक व नगरपंचायत प्रशासन एकत्रितपणे हे प्रश्न सोडवूसागर पोतदारउपनगराध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती