कराड : ख्रिश्चन चर्च मध्ये उपासना. समर्पण विधि व मंडळीचा 136 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड ख्रिश्चन चर्चच्या 136 व्या वर्धापन दिनानिमित्त उपासना समर्पण विधि दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रेसबिटरइन्चार्ज रेव्ह.पौलस वायदंडे यांनी चर्चबद्दलच्या व कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती दिली.
आज कराड शहराला निश्चितच एक सुंदर असा दिवस लाभलाय. कराड शहराला वैभवाच्या व ऐतिहासिक गोष्टींचा खूप प्राचीन वारसा आहे.त्यामध्ये कराड ख्रिश्चन चर्च या नवीन वास्तुची भर पडलीय.मुळातच या चर्चला जवळ-जवळ 136 वर्षांची जुनी परंपरा आहे. आज 136 वर्ष जुनं असं हे चर्च मोठ्या दिमाखात आपल्या समोर उभ आहे. अर्थातच136 व्या वर्धापन दिन साजरा होतोय.जुने चर्च हे खूप छोटं होतं,ते मंडळी व प्रार्थनेसाठी खूप कमी पडत होतं, पण मंडळीना व बंधू-भगिनींना देवाने प्रेरणा दिली, व त्या ठिकाणी नवं चर्च बांधण्याची कल्पना सुचली.पण चर्च बांधणीसाठी आर्थिक बाजू चा प्रश्न आम्हाला भेडसावत होता. पण हा प्रश्न सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन दानशूर भावनेनं सोडवला.त्यामुळे 136 वर्ष जुनं असलेलं हे चर्च आज नव्या स्वरूपात आपल्यासमोर उभ राहिल.
प्रत्येक रविवारी सकाळी दहा वाजता इथे नेहमी प्रार्थना होत असते. कराडसह देशवासियांना व संपूर्ण जगासाठी ही प्रार्थना मनोभावे केली जाते. समाजामध्ये व या पृथ्वीतलावर जगत असताना अनंत अडचणी, समस्या, संकटे असलेले अनेक लोक चर्चमध्ये येतात,नतमस्तक होतात,प्रार्थना मध्ये मग्न होतात.त्यांच्या अडचणीतून निश्चितच त्यांना मार्ग मिळतो. कराड शहराच्या अगदी केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी हे चर्च असल्याने सर्वांना याचा फायदा होतो.या नवीन चर्चचा समर्पण व उद्घाटनाप्रसंगी सर्व धर्मातील सर्वसमावेशक लोकांनी जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला,आपली उपस्थिती दाखवली याबद्दल कराड ख्रिश्चन चर्च कराड के•डी•सी- सी•एन• आय• तर्फे आम्ही आभारी आहोत.

यावेळी मिरवणूक ही काढण्यात आली. चर्चच्या प्रांगणात प्रार्थना, शास्त्रवाचन स्त्रोत्र,जुना करार, नवा करार, प्रेषितांचा मतांधिकार, दानाप्रण प्रार्थना मंडळीचा इतिहास, त्याच बरोबर कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महाराष्ट्रासह देशातून ख्रिश्चन लोक आले होते. अध्यक्ष इन्चार्ज रेव्ह.पौलस वायदंडे, तसेच सेक्रेटरी प्रो.गायकवाड,पास्टोरेट कमिटी डॉ. जॉन अँड्रूज, मि.प्रकाश एबनेजर, मि.सुनील गायकवाड, मि.हेमंत महापुरे, मि.सनी ऑनेस,श्रीमती.एल.एम. घोरपडे सर्व बंधू भगिनी,महिला मंडळ,तरुण मंडळ यांची उपस्थिती लाभली.






















