महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : रेल्वे भूयारी प्रश्नी पुणे येथे रेल्वे मंत्री ची बैठकरयत क्रांति संघटना व पार्ले वडोली निलेश्वर, कोपर्डे हवेली यांनी गेट नंम्बर 98 वरील भूयारी मार्ग त्वरित सुरु करण्याच्या प्रश्नी एप्रिल रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता यावेळी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री यांच्याशी मोबाईल वरुण झालेल्या चर्चेनुसार 23 एप्रिल ला रेल्वे अधिकार्यांसोबात होणाऱ्या उपस्थित राहुन बैठकीत सदर प्रश्न उपस्थित करुण सोडवण्याचे आश्वासन रयत क्रांतिचे नेते सचिन नलवड़े व भाजपा किसान मोर्च्या चे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांना दिले होते।त्यानुसार काल पुणे येथील रेल प्रबंधक कार्यालयात केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री,लोकप्रतिनीधि व रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीत रयत क्रांति संघटनेचे नेते सचिन नलवड़े, भाजपा किसान मोर्च्या प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी उपस्थित राहून पार्ले येथील रेल्वे भूयारी मार्गाचे काम त्वरित सुरु करुण पावसाळ्यापूर्वी बोगदयातील पाणी काढून देण्याची मागणी केली, तसेच पुणे मिरज रेल्वे दुहेरिकरण मध्ये विविध गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी बाधित होत आहेत परंतु अद्यापही त्यांची सयुंक्त मोजनी व भुसम्पादन प्रस्ताव तयार झालेला नाही त्यांचे प्रस्ताव लवकर तयार करावेत अशी मागणी केली वरील मागण्यांची बैठकीत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री यांनी दखल घेवून पार्ले भूयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करुण ग्रामस्थानची ग़ैरसोय दूर करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या

तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रत्यक्षात रेल्वे बाधित होत आहे त्यांचे सर्वे नंम्बर, गट नम्बर गावनिहाय देण्यास सांगितले असून त्या शेतकऱ्यांना हि रेल्वे चा मोबदला मिळवून देण्याची ग्वाही दिली पुणे येथील बैठकीस रेल्वे च्या विविध विभागाचे अधिकारी,रेल प्रबंधक रेणु शर्मा कराड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने रयत क्रांतिचे चे सचिन नलवड़े भाजपा चे रामभाऊ वेताळ,कृष्णत नलवड़े, जालिंदर पवार ग्रामपंचायत सदस्य वड़ोली, सुभाष नलवड़े, रोहित डूबल उपस्थित होते





























" width="90" height="60">
" width="180" height="120">
