महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :
वेद बहुउद्देशीय सामाजिक संस्था वाण्याचीवाडीच्या अध्यक्षा दिपालीताई खोत यांची यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 करिता निवड झाल्याबद्दल मसूर विभागातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
आपल्या सामाजिक राजकीय कामांमधून महिलांसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या दिपालीताई खोत यांना 2023 यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे. दिपाली ताई खोत भारतीय जनता पार्टीमध्ये सातारा जिल्हा सचिव पदी त्या कार्यरत आहेत मसूर भागामध्ये महिलांसाठी सामाजिक राजकीय प्रश्नांना नेहमी वाचा फोडणाऱ्या दिपालीताई खोत यांना या पुरस्कारामुळे त्यांचा सन्मान झाल्याचे बोलले जात आहे.