बिदाल प्रतिनिधी
पांगरी , ता. माण येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सोनाली गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी गजानन जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पांगरी विकास सोसायटीत आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील जोतिलिंग जनशक्ती पॅनेलची एकहाती सत्ता आली . चेअरमनपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी टकले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीस संचालक नथुराम गायकवाड, अशोक गायकवाड, किसन देशमुख, संगीता गायकवाड, पापाभाई मुलानी, सतीश दडस, सुरेश दडस, बाळासाहेब दडस वामन खरात, उपस्थित होते,
या वेळी पांगरी सोसायटीच्या चेअरमनपदी सोनाली गायकवाड व व्हा. चेअरमनपदी गजानन जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली , निवडीप्रसंगी डॉ अजित दडस, विठ्ठल गायकवाड, मुरलीधर गायकवाड, चंद्रकांत दडस, कैलास दडस, नशिर मुलानी, शंकर दडस, दादा दडस, निसार मुलानी, अनिल गायकवाड, अबा लोखंडे लक्ष्मण खरात, बापूराव दडस व नवनिर्वाचित सदस्य पॅनेलचे सर्व कार्यकर्ते, सचिव दत्तात्रय देशमुख उपस्थित होते.
चेअरमन व्हा. चेअरमन व सर्वच सभासदांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
पांगरी ( ता माण) येथे सोसायटीचे संचालक व शेतकरी सभासद (छायाचित्र आकाश दडस)






















