महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : बालाजी हॉस्पिटल, कराड यांच्याबरोबर संयुक्त उपक्रम कराड
:वैद्यकीय विश्वामध्ये सतत प्रगती होते आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा आता भारताच्या मोठ्या शहरांबरोबरच इतरत्रदेखील मिळू लागल्या आहेत. काळासोबत या आरोग्य सुविधादेखील अत्याधुनिक आणि प्रगत होत आहेत. वैद्यकीय तंत्रज्ञान झपाट्याने
प्रगत होत असले तरीही तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला व मार्गदर्शन हे नेहमीच मोलाचे ठरते. अॅस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्राच्या वैद्यकीय विश्वातील एक अग्रगण्य नाव आहे. सर्व प्रकारच्या मल्टिस्पेशालिटी आरोग्य सुविधांसाठी अॅस्टर आधार हॉस्पिटलचे नाव पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांहून अधिक कालावधीत घेतले जाते. या आरोग्य सुविधा कराडमध्ये देखील उपलब्ध व्हाव्यात यासाठी अॅस्टर आधार सुपर स्पेशालिटी क्लिनिक्स आता बालाजी हॉस्पिटल कराड येथे सुरू केली आहे.
या प्रसंगी बोलताना डॉ. नितीन नांगरे (संचालक, बालाजी हॉस्पिटल) म्हणाले, अॅस्टर आधार हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा आता आमच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये नियमित सुरू होत आहेत. याचे लोकार्पण करताना मला विशेष अभिमान वाटतो आहे. वेगवेगळ्या स्पेशालिटीमधील तज्ज्ञ आता कराडमध्ये येणार असल्याने याचा फायदा सर्वसामान्यांना नक्की होईल.”
याप्रसंगी बोलताना डॉ. अमित माने (मार्केटिंग हेड, अॅस्टर आधार हॉस्पिटल) म्हणाले, “आठवड्यातून तीन वेळा असणान्या सुपरस्पेशालिटी क्लिनिक्समध्ये अनुभवी हृदयरोगतज्ज्ञ, मेंदूरोगतज्ज्ञ, न्युरो सर्जन, आयव्हीएफ कन्सल्टंट, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, पल्मनोलॉजी आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ, पोटविकार तज्ज्ञ यांसोबत इतरही तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. या ओपीडी नियमितपणे चालू ठेवून कराडमधील सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्याचा आमचा निश्चय आहे.या सुपरस्पेशालिटी क्लिनिक्सच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी डॉ. नितीन नांगरे, डॉ. अमितमाने, डॉ. हर्षदकुरले व श्री. अतुल कोळेकर व अण्णासो चव्हाण हे उपस्थित होते.