आगामी काळात शिवसैनिकांना बळ देणार खासदार श्रीकांत शिंदे.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कराड येथील मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आले होते. यावेळी त्यांनी प्रथम दत्त चौक येथील छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
खा. शिंदे यांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना श्री. शिंदे म्हणाले की, ठाकरे सरकारच्या योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहचवा, जनतेची कामे करा व गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हि संकल्पना राबवा अशा सुचनाही खा. शिंदे यांनी शिवसैनिकांना दिल्या. यावेळी सातारा, सांगली संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख जयवंतराव शैलार, हर्षद कदम, महिला आघाडीच्या अनिता जाधव, तालुकाप्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे,शहर प्रमुख शशीराज करपे, राजेंद्र माने, मोमीन शेख, दिपक मुट्टल, अजित पुरोहित, शंभू रैनाक, दिलीप यादव, सुनील पाटील, रवी हिनुकले, शहाजी जाधव, प्रविण लोहार, ज्ञानदेव भोसले ,अक्षय मोहिते यांच्यासह कराड तालुक्यातील सर्व शाखाप्रमुख, विभागप्रमुख, आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.