महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
दि. 10 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेच्या दरम्यान पडळ येथील साखर कारखान्यातील प्रोसेसिंग मॅनेजर जगदीप थोरात रा. गोवारे ता. कराड याचा मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सदर मारहाण करणाऱ्यांवर कराड पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत जगदीप यांनी साखरेच्या पोत्यांची अफरातफरी केल्या होत्या त्याचा राग मनात धरून कारखान्यातील जी एम ऑफिस मध्ये मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, प्रभाकर घार्गे, सनी क्षीरसागर, पी ए अंजनकुमार, अशोक नलावडे, शेंडगे मामा व अनोळखी दहा ते बारा जणांनी जगदीश थोरात यांना काठी, फायबर काठी, ऊस व लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मारहाण केली होती त्यानंतर सायंकाळी साडेनऊच्या दरम्यान कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचार करीत असताना जगदीप थोरात यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी त्यांचे प्रेत शवविच्छेदन केले असता त्या अहवालामध्ये त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा, पायावर, हातावर, पाठीवर, पार्श्वभागावर ठीक ठिकाणी काळे निळे वन दिसून आले त्यांची बोटे तळहात सूजलेले दिसून आले. थोरात यांना झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी सदर अठरा ते वीस जणांच्या वर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.