बारामती दि. २६ऑक्टोबर
राज्यातील थेट पद्धतीने निवडून आलेल्या सरपंचांचा समावेश असलेल्या सरपंच परिषदेची स्थापना सर्व सरपंचांच्या एकत्रित पुढाकाराने केली गेली ही एक आनंदाची बाब आहे. कोरेगांव तालुक्यातील सरपंच जितेंद्र भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या पुढाकाराबद्दल मी विशेष अभिनंदन करतो.
या सरपंच परिषदेच्या निमित्ताने सरपंच मंडळींनी समन्वय साधून राज्यशासनाच्या तसेच इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे. ग्रामस्तरावरील विविध समस्यांबद्दल शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी देखील सरपंच परिषदेने पुढाकार घ्यावा. सरपंच परिषदेतील महिलांची टक्केवारी देखील ५० टक्क्यांपर्यंत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
परिषदेच्या माध्यमातून राज्यात संघटनेचं विभागवार जाळं पसरावं, जेणेकरून अधिकाधिक संघटित शक्ती ग्रामपंचायतींच्या उन्नतीसाठी एकत्रित येईल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा त्यामुळे बदलताना दिसेल.असे मा.पवार साहेब मत अनावरण प्रसंगी मत व्यक्त केले आहे.
या अनावरण प्रसंगी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी जितेंद्र भोसले नियुक्ती करण्यात आली असून यावेळी पवार साहेबांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
या अनावरण प्रसंगी राज्यभरातून प्रातिनिधिक स्वरूपात सौ.मंदाकिनी सावंत, शंकरबापू खापे, अमरनाथ गिते, रामेश्वर पाटील, सुशिल तौर, महेश पाटील, हनुमंत पवार, कोहिनूर सय्यद, सत्यपाल गावडे, सौ.रेखा कापरे, सतिष इंगवले, राजश्री खरात, सौ.सिमा देशमुख, सौ.अनिताअढारी, संतोष शेळके,चंद्रकांत सनस,संपत देशमुख,संजय शिंदे, भाऊसाहेब मराठे,अजित माने, अजित भोसले,विष्णू गायकवाड, जीवन जाधव,अमर भोसले,प्रताप चव्हाण,अमर माने, रणजित पाटील,डॉ महेश पवार,सौ शीतल देशमुख, प्रशांत गोरड,राजेंद्र पाटील,आदी विद्यमान सरपंचाची प्रामुख्याने उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यअध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी तर आभार सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ यांनी केले.






















