फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी
फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीस फिल्मी स्टाईल पाटलाकडून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण नुसार दाखल गुन्ह्यातील आरोपी संदीप धनाजी भोसले रा. निंबळक, ता. फलटण, जि. सातारा हा गुन्हा घडल्यापासून गेले दोन वर्ष फरार होता. अक्षय सोनवणे, सपोनि तसेच पोलीस अंमलदार गणेशाअवघडे व चालक यादव असे रात्रगस्त करीत असताना अक्षय सोनवणे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत फरारी आरोपी घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर मौजे वाजेगाव, ता. फलटण गावाच्या हद्दीत सापळा रचून फरार आरोपी यास पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो पोलिसांची गाडी पाहून पळून जाऊ लागताच सोनवणे आणि अवघडे यांनी आरोपीचा 2 किलोमीटर पर्यंत फिल्मी स्टाईल पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले. गुन्ह्याचा पुढील तपास अक्षय सोनवणे सपोनि हे करीत आहेत.
फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डेचव, फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, तसेच बरड पोलीस दूर क्षेत्राचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे ही कामगिरी पार पडली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सातारा अजय कुमार बन्सल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अजित बोराडे यांनी जिल्ह्यातील फरारी आरोपी यांना पकडण्या बाबत मोहीम राबवत फरारी आरोपी पकडण्याचा आदेश दिला होता.