कोळकी : फलटण येथील यंदाची श्रीराम रथयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. राम यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा चालू होती. याञेसाठी दुकाणातील माल भरावा किंवा नाही या संभ्रमात व्यापारी वर्ग होता. परंतु प्रशासनाने श्रीराम रथयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. काहीनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारी श्रीराम रथयात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंदिर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबजावणीसाठी गजानन चौक ते मंडई पर्यंत बेरी कॅटींग करण्यात येणार आहे. श्री राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. मात्र लसीकरण केले असल्याचा पुरावा आवश्यक असणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.