महाराष्ट्र न्यूज साखरवाडी प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 80 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्षरोपण महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंदा डेरी ) मुंबई याठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन महानंदा डेरीचे व्हाईस चेअरमन मा .डी.के. पवार यांनी केले जगामध्ये वाढते तापमान, बदलते हवामान ,होणारी वृक्षतोड , वाढणारी प्रदूषण हे जर टाळायचे असेल वृक्षरोपण काळाची गरज आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी वृक्षरोपण करून मा पवार साहेब यांचा वाढदिवस एक आदर्शवत वाढदिवस म्हणून आपण साजरा करत आहोत असे मत महानंदा डेअरी चे व्हाईस चेअरमन डी.के. पवार यांनी मांडले.
मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने येथे पवार यांनी घेतलेला हा कार्यक्रम उल्लेखनीय आहे महानंदा डेअरी चे वातावरण परिसर अतिशय शांत व हिरवागार आहे याच परिसरामध्ये डी के पवार यांनी लावलेल्या झाडांची भर पडेल त्यामुळे परिसर शुभ दिसेलच तसेच येतील स्वच्छ हवेचे प्रमाण वाढेल याकरिता मी डी के पवार यांचे आभार मानतो व सतत असे वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण घेत रहा असे मत महानंदा डेअरी चे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महानंदा डेरी चे व्यवस्थापकीय संचालक माननीय शामसुंदर पाटील उपव्यवस्थापक हेमंत सर देशमुख दूध वितरण विभागाचे प्रतिनिधी बाळू शिंदे बाळासाहेब माने, कामगार युनियन प्रतिनिधी संजय दळवी राजू परब,अण्णासाहेब जगन दिनेश जोशी व सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केरबा डावरे व आभार प्रदर्शन राम शिंदे यांनी केले