महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे
मायणी येथील सौ.सुष्मा विशाल चव्हाण यांची आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लब, महिला आघाडीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
आ. रोहित दादा पवार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर रोहित दादांच्या नेतृत्वाची युवावर्गावर छाप पडत असून हि संघटना संस्थापक बंडूभाऊ जावळे , कार्यकारी अध्यक्ष सचिनजी काळे, प्रदेश अध्यक्ष जयंतजी भोसले, महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई माने, महिला राज्य सरचिटणीस प्रिती गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.
सातारा जिल्हा महिला सरचिटणीस राजश्री जाधव यांच्या सोबत चर्चा करून सौ . सुष्मा विशाल चव्हाण यांची सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष, माण, खटाव, कोरेगाव पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली असल्याचे सातारा जिल्हा महिला अध्यक्षा दिपाली धर्मराज फरांदे यांनी जाहिर केले.
अनेक सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होणाऱ्या सौ.सुष्मा चव्हाण यांनी यापुढे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आपले कार्य करणार असून यापुढे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार असल्याची ग्वाहीदिली.
सौ.चव्हाण यांच्या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हाचे जिल्हाध्यक्ष हरिष बेडके,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुशांत कोळी-पाटील यांचेसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.