फलटण प्रतिनिधी:- शहरातील आडसुळ नर्सिग होम मधील चोरी प्रकरणी सहा जणांना शहर पोलीसांनी एकुण ३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाला सह अटक केली आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक- १०/०२/२०२३ रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदरचे गुन्हातील फिर्यादी यांच्या आडसुळ नर्सिग होम या हॉस्पीटल मधील खोलीत लावलेल्या युपीएस च्या ६ बॅटरी हॉस्पीटलचे पाठीमागील गेटच, व युपीएस ठेवलेल्या खोलीचे कुलुप हेक्सा ब्लेडच्या सहाय्याने कापुन, फिर्यादीच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने हॉस्पीटलच्या रुममध्ये प्रवेश करुन, रुममध्ये ठेवलेल्या ६० हजार रुपये किमतीच्या ६ बॅट-या कोणीतरी अज्ञात चोट्यांनी दिनांक ०९/०२/२०२३ ते दिनांक- १०/०२/२०२३ रोजीच्या रात्री चोरुन नेहलेबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेली होती.
सदरची तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापुसाहेब बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सपोनि नितीन केनेकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस हवालदार फरांदे, पोलीस नाईक सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल काकासाहेब कर्णे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल बडे यांनी गुन्हाचे घटनास्थळी भेट देउन, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक माहीतीच्या आधारे, सदरचे गुन्हाचा अंत्यंत उत्कृष्ट रित्या तपास करुन गुन्हामध्ये प्रत्यक्ष सहभाग असणा-या आरोपी (१) सौ. सविता संतोष जाधव (वय ३५ वर्षे) (२) सौ. अलका युवराज – घाडगे (वय ४० वर्षे दोन्ही रा. कुंभारटेक मलटण ता. फलटण) (३) सौ. सुगंधा शिवाजी जाधव (वय ४० वर्षे) (४) वनिता चंद्रकांत घाडगे (वय ४७ वर्षे दोन्ही रा.स्वामी समर्थ मंदीराजवळ, मलटण, फलटण जि.सातारा) (५) किरण भिमराव घाडगे (वय २९ वर्षे रा. कुंभारटेक मलटण, फलटण जि.सातारा) यांना व सदरचा चोरीचा माल घेणारा आरोपी नंबर (६) राहुल मारुती भोरे (रा. मलटण, फलटण) अशा एकुण ६ आरोपींना अटक करुन, त्यांचेकडुन चोरलेल्या ६० हजार रुपये किमतीच्या युपीएसच्या ६ बॅट-या चोरीकरीता वापरलेली मारुती ओमनी कार नंबर- एमएच-११ वाय ६३८८, मोबाईल, एक हेक्सा ब्लेड असा एकुण ३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.